Copy past
*आज रासायनिक शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत पण काही ढोंगी हिंदुत्ववादी संघटना,पक्षमंडळी व संत मंडळी,मीडिया यांना गौ रक्षणाबद्दलच्या चर्चेत जास्त रस आहे.असे ढोंगी लोक नैसर्गिक शेती बद्दल चर्चा करताना दिसत नाहीत.अशा गौ राक्षणाबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीचा खरोखरच उद्देश चांगला असेल तर अशा लोकांनी नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.आज लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीच्या मदतीने स्वस्थ,समृद्ध व चिंतामुक्त जीवन जगत आहेत.बरेचसे हिंदू संस्कृती बद्दल आस्था असणारे लोक गाईंच्या रक्षणाबद्दल बोलून आपल्या संस्कृतीची गाई बद्दल असणारी आस्था व्यक्त करतात.गाईंच्या रक्षणाबद्दल बोलताना असे लोक दिवसेंदिवस गाईंची कमी होत जाणारी संख्या याबद्दल दुःखही व्यक्त करतात.पण अशा लोकांकडे गाय पाळणे फायद्याचे कसे ? नेमक्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे व्यावहारिक व प्रभावी उत्तर नसते.गाईचा चांगल्या पद्धतीने सांभाळ फक्त शेतकरीच करू शकतो.गौ शाळा या गाईंचा सांभाळ करण्यात असमर्थ आहेत.गाईंच्या रक्षणासाठी योग्य,प्रभावी आणि व्यावहारिक मार्गही सांगितला पाहिजे.गाईचे आतडे हे सर्व प्रकारच्या खत व कीटकनाशकांचा कारखाना आहेत.गाईच्या आतड्य...