रहस्य निसर्ग शेतीचे

✍🔵 रहस्य निसर्ग शेतीचे🔵✍ ............................ ( भाग - १० ) ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ⚫️ ऊसाचे पाचट जाळणे ♨️ ..............तारक की मारक ? ?⚫️ निश्चितच _ पाचट जाळणं महापाप आहे . पाचट जाळणारे स्वतःचे घर व भविष्य जाळत असतात . तसेच निसर्गाचेही घर जाळत असतात . .........एकरी ५ टन जेव्हा पाचट तुम्ही जाळता तेव्हा त्याच जमिनीवर पुढील ऊसाला जगवणारे सर्व तत्वं त्या पाचटजाळण्यांतून नष्ट करीत असता . तसेच जमिनीत जमीन पहेलवान बनविणाऱ्या अनंत कोटी जीव जंतूंचं राहतं घर तुम्ही नष्ट करीत असता . ➕ ऊसाच्या पाचटात असे आहे काय ?...... ऊस पिक जमिनीतून जी अन्नद्रव्ये उचलतात ती सगळीच असतात . म्हणजे आपण जो ऊस पिकवितो, तो ऊस आपल्या जमिनीतून जे जे काही उचलतं, ते सगळं चिपांड, पाचट व वाढयांत असतं व खोडकीतही असतं हे सगळं (ऊसातील रस सोडून ) जरी जमिनीला आच्छादन म्हणून परत केलं , तरी तेवढा ऊस जगण्याला जे जमिनीतून पाहीजे ते मिळून जातं वरून टाकण्याची गरज राहत नाही . हे पक्के लक्षात घ्यावे . ➕➕ एक हेक्टर उसापासून हे पाचट किती मिळते व त्यात काय असते ? ? ?....... ८ ते १० टन पाचट मिळते . ते जर ऊसात / द्राक्ष /केळी /डाळींब / नारळ / सुपारी / आंबा / संत्रा उभ्या फळपिकात आच्छादन म्हणून वापरले व कुजविले तर त्यापासून ४ / ५ टन खत मिळते हया खतात त्याच्या एकुण वजनाच्या ०.४८ % नत्र , ०.१९ % स्फूरद, ०.९२% पालाश, ०.९४ % कॅल्शिअम , ०.७४ % मॅग्नेशियम , ०.१२% सोडिअम, o.१७ % लोह, ०.००९ % मॅग्नीज, ०.००४ % जस्त,० .०००३ % तांबे .....इत्यादी अन्नघटक असतात. ते वरील सर्व फळपिकांत आच्छादन म्हणून टाकले तर पिकाला सहज उपलब्ध होतातच.. ! शिवाय _जीवजंतूची आच्छादनाखाली व परिसरात प्रंचड वाढ होते व आच्छादनाचे इतर सर्व फायदे मिळून येतातच . त्यासाठी ... ऊसाचे पाचट न जाळून स्व:तावर कृपा करून जीवजंतूचे पर्यायाने निसर्ग सजीवसृष्टीचे रक्षण करुन नैसर्गिक शेतीत यशस्वी वाटचाल करुया . 🌴🌱🌿🍀🌾🍂🍁

Comments

Popular posts from this blog

शेळ्यांचा चारा

All types of feeds seeds for cow, goat & animals

New seed fodder for cow & goats