गोड साखरेची कडू कहाणी....
Posts
Showing posts from January, 2018
शेळ्यांचा चारा
- Get link
- X
- Other Apps
🌿शेळ्यांना द्या संतुलित चारा🌿 शेळी स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या चार ते सहा टक्के इतका वाळलेला चारा दररोज खाते. हिरवा चारा गव्हाणीत टाकताना तो नेहमी स्वच्छ व सुकलेला असावा. शक्यतो गव्हाणीत तो उलटा टांगून ठेवावा. कारण शेळ्यांना उंचावरील ओरबाडून खावयास खूप आवडते. चारा किंवा झाडाची पाने फार कोवळी किंवा जूनही नसावीत. शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडपाला. हा सर्वांत पौष्टिक आहार आहे. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य झाडपाला असतो. डिसेंबर ते जूनअखेर चरण्यासाठीचे गवत फार कमी असते, त्याचे आहारमूल्य उष्णता वाढेल त्याप्रमाणे कमी कमी होत जाते. शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो. सर्व प्रकारच्या झाडपाल्यात पैदास केलेल्या वैरणीपेक्षा व स्थानिक गवतापेक्षा दोन ते तीन पटीने जास्त क्रूड प्रथिने असतात. कॅल्शिअमचे जास्त प्रमाण हे पानांचे वैशिष्ट्य आहे. लागवड केलेल्या गवतापेक्षा दोन ते तीन पटीने कॅल्शिअम पानांत जात असते; परंतु पानांत फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते. शेळ्यांसाठी आहार शेळीच्या आहारातील ...