शेळ्यांचा चारा

🌿शेळ्यांना द्या संतुलित चारा🌿

शेळी स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या चार ते सहा टक्के इतका वाळलेला चारा दररोज खाते. हिरवा चारा गव्हाणीत टाकताना तो नेहमी स्वच्छ व सुकलेला असावा. शक्‍यतो गव्हाणीत तो उलटा टांगून ठेवावा. कारण शेळ्यांना उंचावरील ओरबाडून खावयास खूप आवडते. चारा किंवा झाडाची पाने फार कोवळी किंवा जूनही नसावीत.

शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडपाला. हा सर्वांत पौष्टिक आहार आहे. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य झाडपाला असतो. डिसेंबर ते जूनअखेर चरण्यासाठीचे गवत फार कमी असते, त्याचे आहारमूल्य उष्णता वाढेल त्याप्रमाणे कमी कमी होत जाते. शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो. सर्व प्रकारच्या झाडपाल्यात पैदास केलेल्या वैरणीपेक्षा व स्थानिक गवतापेक्षा दोन ते तीन पटीने जास्त क्रूड प्रथिने असतात. कॅल्शिअमचे जास्त प्रमाण हे पानांचे वैशिष्ट्य आहे. लागवड केलेल्या गवतापेक्षा दोन ते तीन पटीने कॅल्शिअम पानांत जात असते; परंतु पानांत फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते.

शेळ्यांसाठी आहार
शेळीच्या आहारातील घटकामध्ये प्रामुख्याने वाळलेला चारा, हिरवा चारा, पूरक खाद्ये, खनिजे व जीवनसत्त्वांचा समावेश होतो.
वाळलेली वैरण ः ज्वारीचा कडबा, बाजरीचे सरमाड, गव्हाचे काड, मक्‍याची कणसे (बुटा), भाताचा/साळीचा पेंढा, पांढरी कुसळी गवत, अंजन गवत, डोंगरी गवत, बांबूची वाळलेली पाने.
जंगली झाडे ः बोर, बांबू, बाभूळ, कडुनिंब, भेंडी, बेल, जांभूळ, पिंपळ, उंबर, चिंच, अंजन, आंबा, अरडू, अगस्ती, केळीची पाने, पाकेर, शिसम, बरगड, बकान, कांचन, पांगारा, सेमल, ग्लिरिसिडीया, शेवरी, तुती.

🌿शेवरी🌿

हे द्विदल जातीचे सकस चारा देणारे झुडूप आहे. याची पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या आवडीने खातात. दूधही वाढते. यात १८ टक्के प्रथिने असतात. पिकाची लागवड शक्‍यतो बांधावर, उसाच्या शेताच्या कडेने, केळीच्या बागेभोवती, तलावाच्या आजूबाजूस करतात.

🌿सुबाभूळ🌿

ः हे द्विदल जातीचे सकस बारमाही चारा पुरविणारे झाड आहे. ते कमी व जास्त पावसाच्या प्रदेशात वाढतेच पण अवर्षणातही तग धरून राहते. यात २०-२१ टक्के पचनीय प्रथिने, तर ६० टक्के पचनीय पोषक द्रव्ये असतात. त्यापासून भरपूर प्रमाणात "अ' जीवनसत्त्व मिळते.

🌿दशरथ घास🌿

 ः या बहुवर्षीय झुडपाचा सकस पाला जित्राबास फार आवडतो. ओलावा असल्यास झुडूप चांगले वाढते. यात 18-20 टक्के प्रथिने असतात.

🌿हदगा🌿
 
ः या  प्रकारचा घास बारमाही व पाण्याच्या ताणाला तोंड देऊ शकणारे आहे. यात 18-20 टक्के प्रथिने असतात.
लसूण घास ः यामध्ये भरपूर प्रथिने असतात. गोठ्यात बांधून असलेल्या दुधाळ शेळ्यांसाठी व वाढणाऱ्या करडांसाठी हा आदर्श हिरवा चारा आहे. या चाऱ्यात 18 ते 20 टक्के प्रथिने असतात.

🌿COFS31🌿

हे बहुवर्षीय मऊ कडवळाचा सुधारित प्रकार असुन शेळी तसेच दुधाळ जनावरांसाठी अतिशय उपयुक्त आहे यामधे 12-13% प्रथिन असतात

शेळ्यांना चारा देताना लक्षात घ्यावयाच्या बाबी ः
१) शेळी स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या चार ते सहा टक्के इतका दररोज वाळलेला चारा खाते.
२) हिरवा चारा गव्हाणीत टाकताना तो नेहमी स्वच्छ व सुकलेला असावा. ओला (दवयुक्त) असू नये. शक्‍यतो गव्हाणीत तो उलटा टांगून ठेवावा. कारण शेळ्यांना उंचावरील ओरबाडून खावयास खूप आवडते.
३) चारा किंवा झाडाची पाने फार कोवळी किंवा जूनही नसावीत.
४) ताजा द्विदल चारा (उदा. ः लसूण घास, सुबाभूळ) अधिक प्रमाणात देऊ नये. त्याचबरोबर वाळलेले गवत किंवा इतर तंतुमय चारा मिसळून द्यावा.
५) स्वयंपाकघरात उरलेले ज्या-त्या दिवशीचे अन्न, निवडताना बाहेर पडलेले धान्य, हिरव्या पालेभाज्यांची देठे, वाया जाणारी फळफळावळ वगैरे सर्व गोष्टी आपण शेळ्यांच्या आहारात वापरू शकतो.
६) खनिज मिठाच्या विटा शेळ्यांच्या गोठ्यात नेहमी टांगून ठेवणे चांगले असते.
७) शेळ्यांना भरपूर ताज्या व स्वच्छ पाण्याची गरज असते. साठून राहिलेले डबक्‍यातील पाणी शेळ्यांना पाजू नये.

1)सुबाभुळ
2)शेवरी
3)दशरथ घास
4)मेथी घास
5)COFS 31(कडवळ)
6)हदगा
7) मारवेल ( कडी )
8) हत्ती घास सुधारीत ( कांडी )

🌿इत्यादी खात्रीशीर  बियाणे महाराष्ट्रात कोठेही पोहोच मिळेल

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

All types of feeds seeds for cow, goat & animals

New seed fodder for cow & goats