All types of feeds seeds for cow, goat & animals

*लसूणघास / मेथीघास बी उपलब्ध आहे.*
( बहूवार्षिक / 3 वर्षे कापणीचे )

जर कोणाला हवे असल्या संपर्क साधावा
निधी गोट फार्म मो=8668358323







*पुणे येथे सुध्दा उपलब्ध आहे.*

*🚚 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरीअरने पाठविण्याची सोय* 🚚

🌿🌾 लसूणघास / मेथीघास लागवड 🌾

🌾 लसूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण  17 - 20% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ' चारा पिकांचा राजा ' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण  15.9% तसेच  C. 1.25.5 इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.🌾


🌾लसूणघासाची उपयुक्तता  विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात.

🌾लागडवडीसाठी जमिन
लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते. अगदी मध्यम प्रतिच्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनी पर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकांची लागवड केली जाते. भारी जमिन या पिकास अत्यंत उपयुक्त ठरते. निचरायुक्त जमिन यासाठी गरजेची असते.

🌾थंड व कोरड्या हवामानाच्या भागात हे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.


🌾 एकदा पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत 3 ते 4  वर्षे राहत असल्याने पुर्व मशागतीला फार महत्व आहे त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळाचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या - आडव्या कोळवाच्या पाळ्या दाखव्यात. बी पेरणीपुर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत पुर्ण कुजलेले शेणखत घालावे.

🌾लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. एकरी सर्वसाधारण  8 किलो लागते काही काही भागात जमीनीच्या कुवती प्रमाणे वापरावे लागते.

🌾बी फेकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो.

🌾  लसूणघासाचे पीक हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्यावेळी करणे अतिशय महत्त्वाची असते.

🌾लसूणघासाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात  8 - 10 दिवसांनी तर  हिवाळ्यात  10 - 12 दिवसांनी जमिनीजमिनीच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

🌾लसूणघास दुभत्या जनावरांना खायला  दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते  व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते.

🌾लसूणघासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे  45 ते 50 दिवसात येते. फुलोय्रात येण्यापुर्वीच लसूणघासाची कापणी करावी 21ते 25दिवसात योग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.

🌾हा घास शेळ्या खुप आवडीने खातात तर चला मग उन्हाळ्यात वापराच्या सकस आणि कसदार हिरवा चारा तयार करायच्या तयारीला लागा आणि खात्रीशीर बी संपायच्या आगोदर call करा 🙏🏻

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेळ्यांचा चारा

New seed fodder for cow & goats