🌿शेळ्यांना द्या संतुलित चारा🌿 शेळी स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या चार ते सहा टक्के इतका वाळलेला चारा दररोज खाते. हिरवा चारा गव्हाणीत टाकताना तो नेहमी स्वच्छ व सुकलेला असावा. शक्यतो गव्हाणीत तो उलटा टांगून ठेवावा. कारण शेळ्यांना उंचावरील ओरबाडून खावयास खूप आवडते. चारा किंवा झाडाची पाने फार कोवळी किंवा जूनही नसावीत. शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडपाला. हा सर्वांत पौष्टिक आहार आहे. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य झाडपाला असतो. डिसेंबर ते जूनअखेर चरण्यासाठीचे गवत फार कमी असते, त्याचे आहारमूल्य उष्णता वाढेल त्याप्रमाणे कमी कमी होत जाते. शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो. सर्व प्रकारच्या झाडपाल्यात पैदास केलेल्या वैरणीपेक्षा व स्थानिक गवतापेक्षा दोन ते तीन पटीने जास्त क्रूड प्रथिने असतात. कॅल्शिअमचे जास्त प्रमाण हे पानांचे वैशिष्ट्य आहे. लागवड केलेल्या गवतापेक्षा दोन ते तीन पटीने कॅल्शिअम पानांत जात असते; परंतु पानांत फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते. शेळ्यांसाठी आहार शेळीच्या आहारातील ...
*लसूणघास / मेथीघास बी उपलब्ध आहे.* ( बहूवार्षिक / 3 वर्षे कापणीचे ) जर कोणाला हवे असल्या संपर्क साधावा निधी गोट फार्म मो=8668358323 *पुणे येथे सुध्दा उपलब्ध आहे.* *🚚 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरीअरने पाठविण्याची सोय* 🚚 🌿🌾 लसूणघास / मेथीघास लागवड 🌾 🌾 लसूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 - 20% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ' चारा पिकांचा राजा ' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण 15.9% तसेच C. 1.25.5 इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.🌾 🌾लसूणघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात. 🌾लागडवडीसाठी जमिन लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते. अगदी मध्यम प्रतिच्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनी पर्यंतच्या भिन्न प्रक...
*🌿दशरथ घास 🌿* ▪ दशरथ हे वर्षभर चारा देणारे व्दिदल जातीचे चांगले पोषणमुल्य असलेले बहुवार्षिक चारापीक आहे. ▪ह्या चाय्राच्या मुळावर नत्रयुक्त ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी हवेतील नत्र शोषत असल्याने झाडाची नत्राची भासते शिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. ▪ दशरथ मधील हिरव्या भागातील अंदाजे पोषण मुल्य प्रथिने 22.31, स्निग्ध पदार्थ 2.61, तंतुमय पदार्थ 24.30, कर्बोदके 43.97. ◾ जमिन ह्या चारापीकासाठी खोल मशागत केलेली योग्य आहे अशा जमिनीत ते चांगले रूचते. सुपीक जमीनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ▪ पेरणीसाठी बीज प्रक्रिया बीज कवच कठीण असल्यामुळे पेरण्याआधी ह्या पिकाच्या बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण चांगली होते. बीज प्रक्रियेसाठी पाण्याला चांगली उकळी आल्यावर पाण्याचे भांडे गॅसवरून खाली उतरून 5 मिनिटे ठेवावे पाण्याचे तापमान 80 सेल्सिअस होईल त्यात प्रक्रियेसाठी घेतलेले बी टाकून 15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर गरम पाणी निथळून बी पुन्हा गार पाण्यात रात्रभर...
Comments
Post a Comment